श्री चिंतामणी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी तय्यब अली काझी
औसा प्रतिनिधी
गिरीश इळेकर आणि प्रवीण कारंजे यांचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयोग
श्री चिंतामणी गणेश मंडळाची स्थापना सण 1965 साली करण्यात आली आमच्या मंडळात प्रति वर्षी अनोखे, वेग वेगळे उपक्रम आम्ही सर्व जनतेस दाखवून त्यांचं मन उत्साही करतोत व तसेच लहान मुलं मुलींसाठी वेगवेळ्या स्पर्धा आयोजित करून त्यांचं गुनकौशल्य व मनोबल वाढवावे हीच आमच्या मंडळाची भावना असते. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही बक्षीस वितरण सोहळा साजरीकरण करतोत. आमच्या गणेश मंडळाची खासियत ही वेगळीच ओळख निर्माण करून देत असते तरी ह्या वर्षी आम्ही म्हणजेच श्री गिरीश इळेकर व प्रवीण कारंजे आम्ही एक बैठक घेऊन एक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वधर्म समभाव ह्या उदेशाने आमच्या श्री चिंतामणी गणेश मंडळाचे ह्या वर्षीचे *अध्यक्ष पदी मुस्लिम समाजातील आमचे प्रिय मित्रबंधु तय्यबअली गुलामनबी काझी यांची सर्वानुमते निवड करून आम्ही जनतेस दाखवून दिलं की आम्ही सर्व एक आहोत.
0 Comments