ग्रामविकास सचिव यांच्या हस्ते लोदगा येथे सेवा पंधरवाडा निमित्त रेशन कार्ड वाटप
 औसा प्रतिनिधी
 केंद्र सरकारच्या धोरणा नुसार दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्या निमित्त महसूल विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाच्या सेवा विनाविलंब देता याव्यात आणि महसूल प्रशासन गतिमान व्हावे या उद्देशाने तहसील कार्यालय औसा व ग्रामपंचायत लोदगा यांच्या संयुक्त विद्यमाने रेशन कार्ड व विविध प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जनता विद्यालय लोदगा येथे आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या  ग्रामविकास विभागाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा ,(आयएएस) यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना रेशन कार्ड व विविध प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज  बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,तहसीलदार भरत सूर्यवंशी, पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे, सरपंच लोदगा व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते‌. महसूल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे लोदगा ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments