रेशन कार्डधारकांना आधार जोडणी करण्याचे आवाहन
 औसा प्रतिनिधी
 माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर यांचे दिनांक 15 -9 -2022 च्या पत्रा अन्वये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी आपले रेशन कार्ड वरील कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड शिधापत्रिकेस जोडणी करणे आवश्यक आहे. औसा तालुक्यातील 15980 एवढ्या लाभार्थ्यांचे आधार जोडणी करणे अद्यापही शिल्लक आहे. शासन स्तरावर सतत पाठपुरावा करून ही आधार जोडणीचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधार कार्ड शिधापत्रिकेस जोडणी ज्यांनी केली नाही, अशा लाभार्थ्याच्या याद्या संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. याबाबत गावांमध्ये दवंडी देऊन सोशल मीडियावर प्रसिद्धी करून तसेच लाभार्थ्याच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व स्वस्त धान्य दुकानासमोर प्रदर्शित करून नागरिकात जनजागृती होणे आवश्यक आहे. स्वस्त धान्य दुकानदार यांना हे काम सोपविले असून या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित तलाठी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार रास्त भाव दुकानदार यांच्यामार्फत जा लाभार्थीचे आधार कार्ड शिधापत्रिकेस जोडणी केलेले नाही, त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन त्यांचे ई पॉज मशीन वरून त्यांचे आधार कार्ड केवायसी करून जोडून घेण्यात यावेत. जे लाभार्थी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आपले आधार शिधापत्रिकेशी जोडून घेणार नाहीत त्यांची नावे ऑनलाईन मधून वगळली जातील याची संबंधित शिधापत्रिका धारक व कुटुंबप्रमुखांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी व तालुका पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांमुळे केले आहे.

Post a Comment

0 Comments