*आलमला येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे आनंद अनुभूती शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
आलमला- श्री रामनाथ विदयालय, आलमला येथे 13 ते 18 सप्टेंबर 2022 दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग चे आनंद अनुभूती शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात योगा, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रिया आदि गोष्टीचे मार्गदर्शन करून आपल्या जीवनात आनंदी ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात एकूण 45 लोकांनी सहभाग नोंदवून सहा दिवस रोज सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान या शिबीरात योग साधना केली, या शिबिरास श्री. कैलास जगताप सर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी रामनाथ नगर, आलमला येथे शिबिरातील लोकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी श्री. बाबूसिंग ठाकूर, सौ. जयमाला हिंगणे, सौ. महादेवी धाराशिवे, श्री. प्रवीण जगदाळे,श्री. संगमेश्वर पाटील, श्री. रमाकांत देशपांडे, प्रा. चंद्रशेखर चरकपल्ले, सौ. शशिकला कापसे, श्री. सूर्यकांत जाधव, श्री.सोमेश्वर
धाराशिवे, श्री वैजिनाथ पांचाळ, श्री राम व्हनाळे, श्री. राजकुमार धाराशिवे, सौ. नैना ठाकूर, श्री. गुरुनाथ कुंभार, श्री. रमेश कुंभार, श्री. नितीन आंबुलगे, सौ. संगीता गायकवाड, श्री श्रीधर हुरदळे, रामनाथ नगर येथील ग्रामस्थ उपस्तिथ होते.
0 Comments