*आझाद महाविद्यालयाची नॅकच्या समितीकडून पाहणी*
 औसा_येथील हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या आझाद महाविद्यालयाची नॅकच्या (NAAC) मूल्यांकन समितीकडून ३ व ४ रोजी पाहणी करण्यात आली असून महाविद्यालय आता नॅककडून  मिळणाऱ्या ग्रेड च्या प्रतिक्षेत आहे.भेट देणाऱ्या समितीमध्ये चेअरमन डॉ.अजमेरसिंग मलिक सदस्य प्राचार्य डॉ.संजयकुमार शाह, प्रा डॉ.गुलाम मोहम्मद भट्ट यांचा समावेश होता. समितीचे ०३ऑगस्ट रोजी महाविद्यालयात संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी,अरब सर,प्राचार्य डॉ.ई.यू मासूमदार,सुलेमान शेख,सर्व प्राध्यापक यांच्याकडून स्वागत करण्यात आले.नॅक समितीने महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली तसेच महाविद्यालयाच्या विविध समितींच्या कार्याचा आढावा घेतला.आजी_माजी विद्यार्थी व पालक मेळाव्यातून संवाद साधला.महाविद्यालयात असणाऱ्या विविध भौतिक सोयीसुविधांची पाहणी देखील समितीकडून करण्यात आली.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण समितीसमोर केले.अंतिमत: समितीने महाविद्यालयाचे सर्व पाहणीतून मूल्यांकन करून अहवाल सादर केला असून लवकरच महाविद्यालयास नवीन ग्रेड प्राप्त होईल.एक्झीट मीट साठी समितीचे तिन्ही सदस्य,प्राचार्य,तसेच संस्था सचिव डॉ.अफसर शेख,अरब सर, नॅक समन्वयक प्रा.डॉ एम.एम बरोटे, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ एन.के सय्यद, सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments