कॉम्प्युटर पार्क येथे श्री गणेशाची उत्साहात स्थापना
औसा प्रतिनिधी
औसा येथील कॉम्प्युटर पार्कचे संचालक काशिनाथ सगरे यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षापासून कॉम्प्युटर पार्कच्या संकुलामध्ये प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाची स्थापना केली जाते यावर्षी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव आणि वीरशैव गणेश मंडळाचे अध्यक्ष गिरीश इळेकर यांच्या हस्ते पूजा करून श्री ची स्थापना करण्यात आली. यावेळी मल्लिनाथ केवळ राम, नजीर सर पत्रकार विनायक मोरे, राम कांबळे, इलियास चौधरी, मुक्तार मणियार, किशोर जाधव, व्यापारी बचत गटाचे राम मसलगे बालाजी भुरे, आत्माराम मिरकले यांच्यासह कॉम्प्युटर पार्कचे विद्यार्थी उपस्थित होते. आणि श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर महाआरती करून प्रसाद वितरित केला.
0 Comments