निळकंठेश्वर यात्रेची जय्यत तयारी
औसा प्रतिनिधी
निळकंठेश्वर यात्रा दि१२ते २२ आगस्ट पर्यत चालु राहाणार आहे.
त्या निमीत्ताने देवस्थान कमेटी जय्यत तयारी करीत आहे. दर्शन मंडप,दर्शन रांगा ,स्वंसेवक गार्ड,,खेळणी स्टाल,हॉटेल ,बेलफुले स्टाल, पाळणे ,ब्रेक डान्स,मौतकुवा,पोलीस बंदोबस्त ,पाणी ,लाईट ,वहान पार्कींग, भोजन व्यवस्था, मोफत वहान स्थळ, गाडया पार्किंग अदीची व्यवस्था करण्यात येत आहे .
यात्रेत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
* सामाजीक कार्यक्रमा मधे रक्तदान शिबीर, नेत्र चिकीत्सा व शस्त्रकिया शिबीर, प्राचीन काळपासुनचे आतापर्यंतचे दुर्मीळ टेलीफोन प्रदर्शन, डॉ स्वागत तोडकर याचे व्याख्यान व शिबीर आदि कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
* मंदीर कळस व परीसरात विद्दुत रोषनाई करण्यात आली आहे.
* यात्रेचे आकर्षण अभिनेत्री इशा आग्रवाल, बालाजी सुळ, इंदुरीकर महाराज राहाणार आहेत.
*दि.१२आगष्ट रोजी किल्लारी गावातुन पालखी निघुन ईश्वरढव येथील निळकंठेश्वर पिंडीला पालखी भेटुन निळकंठेश्वर मंदीरामध्ये येऊन यात्रेला सुरवात होत आहे
* हररोज ९ते 12 किर्तन होणार आहे लामध्ये हभप सुनीता मोहीते लातुर, शि.भ.पा. संगनबस्वेशर महास्वामी, हभप धनंजय जोशी महाराज शेगाव शि.भ पा. बाबुराव सोनटक्के, हभप गुरुवर्य श्र संदीपान महाराज, हभप नितीन जगताप, हभप स्वाध्वी मुक्ताईनाथ माऊली,हभप कु.शिवलीलाताई पाटील बार्शीकर, हभप निवृती महाराज इंदुरीकर, हभप सौ नागेशरी ताई झाडे आळंदी , यांचे कर्तन होणार आहे.
यात्रा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र जळकोटे, सुर्यकांत बाळापूरे बिसरसिंग ठाकूर,देवीदास मिरकले, अंकुश भोसले,प्रशांत गावकरे,भारत बोळशेट्टे,मडोळे गुरुजी,पप्पु भोसले,जितू शिंदे,श्याम घोरपडे,राजू बिराजदार,खंडू बिराजदार आदि परिश्रम घेत आहेत.
0 Comments