महसूल दिनानिमित्त शोभा पुजारी यांचा गौरव

 औसा प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी व सर्व संबंधित नागरिकांना महसूल विभागामार्फत आवश्यक असणाऱ्या सुविधा विना विलंब आणि विना अडथळा मिळाव्यात यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील असते महसूल विभागामार्फत उत्कृष्ट काम केल्याबद्दल औसा येथील तत्कालीन तहसीलदार शोभा पुजारी यांना महसूल दिनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. 1993 च्या प्रलयकारी भूकंप नंतर भूकंपग्रस्त भागातील जनतेच्या समस्या तातडीने सोडविणे तसेच मागील दोन वर्ष कोरोना काळामध्ये आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी समन्वय साधून महसूल कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तसेच पोलीस प्रशासनाची मदत घेऊन जनतेची कामे वेळेत करून कोरोना काळात सर्वांना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच तालुक्यातील महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रश्नांची वेळेत सोडवणूक करणे आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना शेत रस्ते शिव रस्ते मोकळे करून देऊन शेतकऱ्याच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सर्वांना समन्वय साधून शेत रस्ते मोकळे करून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून झाले आहे. शालेय विद्यार्थी व पालकांना लागणारे सर्व शैक्षणिक दाखले वेळेत देणे अशा विविध माध्यमातून होणारी कामे विना विलंब करण्यासाठी औसा येथे कार्यरत असताना तहसीलदार म्हणून शोभा पुजारी यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महसूल दिनानिमित्त त्यांना केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल व केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल औसा तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments