महावितरणच्या भादा शाखा कार्यालयाचे विभाजन करण्याची मनसेची मागणी

औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील लातूर ग्रामीण मधील महावितरणच्या भादा शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन शिवली शाखा कार्यालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव आज मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व ऊर्जा विभागाचे मा.प्रधान सचिव यांना सादर केले.
औसा तालुक्यातील  लातूर ग्रामीण मधील महावितरणच्या भादा शाखा कार्यालयांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या शिवली,बिरवली,टाका,वरवडा, वानवडा,यलौरी,येल्लोरी वाडी, टेंभी, शिंदाळा,शिंदाळवाडी तसेच वडजी,आंदोरा व जायफळ यासह अनेक गावात विजेचा नेहमीच लपंडाव सुरू असून ठरलेल्या वेळेनुसार थ्री व सिंगल फेज चा वीजपुरवठा वेळेवर होत नसल्याकारणाने व या भागातील शेतकरी,ग्राहक व नागरिकाची हेळसांड होत असल्याने या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या विषयावर विविध आंदोलने, उपोषणे, मोर्चे,रस्तारोको करण्यात आले होते. नागरिकांच्या तक्रारीची व मनसेच्या आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाचे  लातूर परिमंडल (महावितरणचे) मुख्य अभियंता यांनी भादा शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन शिवली शाखा कार्यालय निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव मा. सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांना सादर केला होता. त्याविषयीचा पाठपुरावा करत आज तो प्रस्ताव राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव माननीय दिनेश वाघमारे साहेब यांना सादर करून हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून या भागातील शेतकरी नागरिक व ग्राहकाची होत असलेली हेळसांड लवकर दूर करावी अशी विनंती करण्यात आली.या निर्मितीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास शिवली शाखेकरिता एक स्वतंत्र शाखा अभियंता व दहा ते बारा लोकांचा स्टाफ या कार्यालयास मिळेल अशी अपेक्षा आहे, याप्रसंगी मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे,  जिल्हा सचिव धनराज गिरी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार, विधानसभा संघटक महेश बनसोडे, औसा शहराध्यक्ष प्रवीण कठारे, शहर सचिव अमोल थोरात, बळी वाघमारे, दीपक नवाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments