सुलेमान शेख यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची धुरा 
औसा प्रतिनिधी
 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान शेख यांची नियुक्ती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी करण्यात आली असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाचे संघटन करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी मध्ये पक्ष कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल मोटे, यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा. एन बी शेख यांचे ते नातू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लातूर ग्रामीण जिल्ह्याचे कार्याध्यक्ष तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचे ते सुपुत्र आहेत. पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, का. सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती आघाडीच्या सक्षणाताई बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विश्वासाला पात्र राहून काम करू अशी ग्वाही नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर सुलेमान शेख यांनी दिली.

Post a Comment

0 Comments