औसा तालुक्यातील नेत्रहीन, दिव्यांग अपंगासाठी विविध शासनाचा सरकारने लाभ द्यावा -बहुजन समाज पार्टीची मागणी

औसा तालुक्यातील नेत्रहीन,दिव्यांग अपंगासाठी विविध शासनाचा लाभ द्यावा -बहुजन समाज पार्टीची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील नेत्रहीन,अपंग व्यक्तींना त्यांचे उदरनिर्वाह करीता दरमहा 3 हजार रुपये मदत म्हणून देण्यात यावे व त्यांच्या घरच्या लाईट बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावीत. नेत्रहीन व अपंग व्यक्तींच्या मुला मुलींच्या लग्न कार्यासाठी 1 लाख रुपये मदत मिळवून सरकारने द्यावीत. अशी मागणी बहुजन समाज पार्टी औश्याच्या वतीने दिनांक 22 आॅगस्ट सोमवार रोजी औसा तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.यावेळी निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल कांबळे,औसा विधानसभा अध्यक्ष चाॅदपाशा महेमूद लोणे, सोहेल अब्दूल गफार,हणमंत लोढे,नईम काझी,शेख नवीद, संतोष लोहार,ओम हजारे,शेख अजिम, अर्जून धोंडीबा बांगर,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments