हिप्परसोगा सोसायटीच्या चेअरमनपदी स्वयंप्रभा पाटील तर सुवर्णा यादव व्हाईस चेअरमन

औसा प्रतिनिधी 
 ओसा तालुक्यातील हिप्परसोगा वि.का.से.स.सोसायटी निवडणूकीत सलग तिस-यांदा चेअरमनपदी  स्वयंप्रभाताई पाटील यांची निवड करण्यात आली. तर व्हा. चेअरमनपदी सुवर्णा यादव यांची निवड करण्यात आली.
        या निवडीकडे संबंध तालूक्याचेच नाही तर स्वयंप्रभाताई पाटील या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
         सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, महाराष्ट्राचे नेते अमीतभैय्या देशमुख साहेब व लातूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे चेअरमन युवानेते धिरजभैय्या देशमुख साहेब यांच्या परीवारात व त्यांया विचारांचा वारसा घेऊन एकनिष्ठपणे काम करणा-या स्वयंप्रभाताई पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त करुन परत तिस-्यांदा त्यांच्यावर चेअरमनपदाची धुरा दिली.गेली पंधरा वर्षं सातत्याने शेत-यांच्या विकासासाठी त्या काम करत असून गावातील सर्वांशी सामंज्यास्याने प्रेमाने आणि निर्भयपणे काम करत शेतक-यांना न्याय देण्याचे काम केले आहे. या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतूकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments