रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्या वर औसा पोलिसांची कार्यवाही
 औसा प्रतिनिधी
 औसा शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत. रहदारीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे लहान मोठे अपघात सतत घडत असल्यामुळे ऐन रस्त्यावर अतिक्रमण करून रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करीत फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर औसा पोलिसांनी कार्यवाही केली दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास औसा पोलिसांनी रस्त्यावर फळांची विक्री करणारे गाडी जप्त करीत पोलीस स्टेशनमध्ये आणून सदरील फळ विक्रेत्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 14 फळ विक्री करणाऱ्या गाडे धारकावर ही कार्यवाही केली असल्याचे कळते यानंतर पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेतच गाडी उभा करावेत आणि फळ विक्रीचा व्यवसाय करावा अशी समज फळ विक्रेतांना पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments