बुधोडा ग्रामपंचायत सदस्याचे धरणे आंदोलन गटविकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे 
औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील बुधोडा ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेतून विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार मागील अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्य बालाजी मिटापल्ले यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही ग्रामपंचायत मधील निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत त्यांनी तक्रार केली होती या संदर्भात सखोल चौकशी करावी या मागणीसाठी दिनांक 10 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य बालाजी मिटापल्ले यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन धरणे आंदोलन सुरू केले होते. याबाबतची गटविकास अधिकारी यांनी चौकशी करण्यासाठी समिती नेमली असता या समितीचा अहवाल आपणास मान्य नाही म्हणून उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत बुधोडा ग्रामपंचायतच्या विविध विकास कामाच्या दर्जाची तपासणी व्हावी अशी आग्रही मागणी करीत त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. गट विकास अधिकारी औसा यांनी याबाबत ग्रामपंचायत बुधोडा येथे जाऊन उच्चस्तरीय समिती साठी आपण शिफारस करू असे आश्वासन दिल्यानंतर बालाजी मिटापल्ले यांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले. या कामी ग्रामविकास अधिकारी गिरी यांनीही धरणे आंदोलन कर्त्यास पंचायत समिती स्तरावरून चौकशी झाली असून यापुढे आपण सहकार्य करू असे विनंती केली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका ग्रामपंचायत सदस्य बालाजी मिटापल्ले यांनी घेतली आहे.धरणे आंदोलन स्थळी बीट अंमलदार संजय बेरळीकर यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments