सरकारने अतिवृष्टी जाहीर केलेली मदत तुटपुंजी शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत द्यावी
गणेश माडजे..
औसा प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा क्षेत्रीय मराठा फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश माडजे यांनी केला आहे. शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी प्रशासन यंत्रणेने नुकसानी बाबत चुकीच्या नोंदी घेतले आहेत पंधरा लाख हेक्टर ची नोंद प्रशासनाने घेतली आहे. परंतु अक्षरशा महाराष्ट्रभरात जवळपास 25 लाख हेक्टरचे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी तिबार पेरण्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडली आहे सत्ता स्थापन व व मंत्रीपदात मग्न आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले जनावरे वाहून गेले शेतकरी मरणाच्या दारात उभा होता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या संकट समय साथ दिली नाही उलट जाणीवपूर्वक पिकांचे कमी नुकसान दाखवून दिशाभूल करण्याची आकडेवारी प्रशासनामार्फत माहिती प्राप्त करीत सरकारने हेक्टरी 13 हजार सहाशे रुपये मदत जाहीर केली. ही मदत अक्षरशा तुटपुंजी आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग करणारी आहे त्यामुळे सरकारने वेळ काढू पणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी गणेश माडगे यांनी केली आहे अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
0 Comments