पं. शिवरुद्र स्वामी यांच्या भैरविणे
आचार्य भातखंडे संगीत समारोहाची सांगता

औसा प्रतिनिधी
दि. 8 ऑगस्ट 2022

       औसा येथे मुक्तेश्वर मंदिरात माऊली प्रतिष्ठानच्या वतीने 5 ते 7 ऑगस्ट रोजी आचार्य भातखंडे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. 
       या तीन दिवसांच्या काळात चैतन्य पांचाळ यांनी राग मुलतानी गोकुळ गाव का छोरा, सुंदर सुरजनवा या बंदिशी बरोबर साधा ऐसा गुरू भावे हे भजन गायिले.
        पं. विठ्ठलराव जगताप यांनी राग मधूवंती या बरोबर संत भार पंढरीत, झणी दृष्टी लागो हे स्वरचित अभंग म्हंटले.
      पं. बाबुराव बोरगावकर यांनी राग गावती, तरणा या बरोबर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर हे अभंग गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
       हरीश कुलकर्णी यांनी राग मधूवंती मध्ये गुरुकृपा आज भयो  ही बंदिश, समाधी साधन, दिनाची माऊली या अभंगाबरोबर  या भवनातील गीत पुराणे हे नाट्यगीत सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.
       पं. रेवय्या वस्त्रदमठ यांनी राग मधूवंतीमध्ये  हार्मोनियम सोलो सादरीकरण केले.
        पं. गिरीश गोसावी यांनी राग किरवानी मधील अब तो भई ही बंदिश, प्रेम सेवा शरण हे नाट्यगीत, पंढरीचे सुख आणि माझे माहेर पांढरी हे अभंग गाऊन त्यांनी रसिकांची मने जिंकली.
       पं. डॉ. विकास कशाळकर  यांनी राग आलया बिलावल, राग शिवमत भैरव आणि रामकली  या  बंदिशी गायल्यामुळे रसिक भारावून गेले.
                   अदिती जोशी यांनी  राग गौडम्हलार मध्ये काहे हो, सावरी बदरिया, राग मुलतानीमध्ये पकरी मोरीबैया या बंदिशी, तराणा, लावण्याचा गाथा भजन आणि नरवर कृष्णा समान हे नाट्यगीताचे गायन केले.
      गोपाळ जाधव यांनी ताल चौताल मध्ये पखावज सोलो सादर केले.
        पं. शिवरुद्र स्वामी यांनी राग भीमपलास मध्ये अब तो बडी बेर, बिरज मे धूम मचाओ कान्हा, राग सूरमल्हार मध्ये बादरवा बरसे या बंदिशी नंतर पदंमनाभा नारायणा हे भजन आणि पायलिया बाजे रे मोरा बाबुल मोरा नैहर छुटो जाय या भैरवी ठुमरी सांगता झाली.
       यावेळी पं. दीपक लिंगे, तेजोवृष जोशी, पं. पांडुरंग मुखडे, जनार्दन गुडे, तेजस धुमाळ,शंकर जगताप, गणेश बोरगावकर यांनी तबला आणि हार्मोनियम साथसंगत केली.
      कार्यक्रमाचे उदघाटन अड. मुक्तेश्वर वागदरे, धनंजय कोपरे, रवी राचट्टे, व्यंकट पन्हाळे ,
विजयकुमार मीटकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
      प्रास्ताविक  व्यंकटराव राऊतराव यांनी सूत्रसंचालन प्रा. युवराज हालकुडे यांनी तर व्यंकट पन्हाळे यांनी आभार मानले.


         

Post a Comment

0 Comments