माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास पालिका प्रशासक यांच्याकडून टाळाटाळ
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या कार्यकाळातील आर्थिक खर्चाची व नगर परिषदेच्या वतीने अर्धा केलेल्या बिलाची माहिती ही जन माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली असून अर्ज देऊनही एक महिना पूर्ण झाला असला तरी पालिकेचे प्रशासक अजिंक्य रणदिवे यांच्याकडून माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळा होत असल्याची तक्रार गोविंद दादाराव पवार यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक 29 जून 2022 20 जुलै 2022 26 जुलै 2022 आणि एक ऑगस्ट 2022 रोजी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक खर्चाची माहिती द्यावी अशी मागणी आपण केली असता अर्ज देऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असून तर परिषदे कडून आपणास माहिती मिळत नसल्याने आपण संदर्भ क्रमांक दोन अन्वये अपील दाखल केले आहे. परंतु सदरील माहिती देण्यासाठी नगरपालिका सतत टाळाटाळ करीत असल्याने आपण मागितलेली माहितीची संख्या कमी करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे. उपरोक्त विषयांकीत प्रकरणाची माहिती देण्यास आदेशित करावे अशी मागणी गोविंद पवार यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे दिलेल्या अर्जाद्वारे केली आहे.
0 Comments