औसा तालुका काँग्रेस पक्ष सोशल मीडिया अध्यक्षपदी विठ्ठल पांचाळ यांची निवड

औसा प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष मा. श्री. विशालजी मुत्तेमवार यांच्या मान्यतेने औसा तालुक्यात सोशल मिडिया  विभागाच्या औसा विधानसभा अध्यक्षपदी पांचाळ विठ्ठल बालाजी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवणे त्याचा प्रसार, प्रचार आणि त्यांच्या कार्याची ग्रामीण भागातील तळागाळातील लोकापर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडिया आवश्यक असते. त्यादृष्टीने औसा तालुक्यांतील नूतन तालुका काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्षांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रविण सुर्यवंशी,ओबिसी मराठवाडा अध्यक्ष प्रा सुधीर पोतदार, औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शकिल शेख, जि.प उपाध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी विलासराव देशमुख युवा मंच अध्यक्ष रवि पाटील, शहराध्यक्ष खुनमीर मुल्ला,दिपक राठोड,अंगद कांबळे,मंजुषा हजारे,मुरली सोनटक्के, नामदेव माने,वेताळेश्वर बावगे, मुकेश बिदादा,उदयसिंह देशमुख, सचिन गिराम, अमित सोलापुरे,आदम शेख, विश्वास काळे,संजय लोंढे,किरण सोमवंशी,संजय बाबळसुरे यांच्या सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मा. आ.अमित विलासरावजी देशमुख, आ. धिरज विलासरावजी देशमुख आणि जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या विचारानुसार पुढील काळात काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण भरीव काम कराल म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले या निवडीबद्दल नवनिर्वाचित औसा तालुका काँग्रेस सोशल मीडिया नूतन अध्यक्षाचे  लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या सह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments