मोतीचंद व्यंकोबा दुरुगकर यांना जैन कासार प्रतिष्ठान तर्फे सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार जाहीर
औसा प्रतिनिधी:
औसा- येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीचंद व्यंकोबा दुरुगकर यांना सोलापूर येथील जैन कासार प्रतिष्ठान तर्फे सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. रविवार दि २८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सोलापूर येथील डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात जगत्विख्यात प्लस्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांच्या हस्ते व जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष कांतीलाल नळे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी डॉ विठ्ठल लहाने यांचे यशाचा पासवर्ड या विषयी व्याख्यान होणार आहे.
मोतीचंद दुरुगकर हे कासार गुरुजी या नावाने ओळखले जातात. शिक्षक ते केंद्रीय मुख्याध्यापक असा संपूर्ण प्रवास ३६ वर्षे त्यांनी सायकलवर केला. . ५ मार्च १९५४ रोजी औसा तालुक्यातील भेटा या गावी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर चाटा, कन्हेरी, आपचुंदा, वांनवडा, लखनगाव आदी ठिकाणी सायकलवरच जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. गोठ्यातून त्यानी मुलांना शिकवले. शेवटचे १५ वर्ष केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. १९८८ ला सेवानिवृत्त झाले तेव्हा लातूर तालुक्यातील चाटा या गावी बैलगाडी मधून वाजत गाजत मिरवणूक काढली, व यथोचित सन्मान करून निरोप दिला. नोकरीच्या काळात त्यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात देखील काम केले.औसा येथील सार्वजनिक गणेश मंडळ ते नवरात्र उत्सव मध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. चिंतामणी गणेश मंदिर उभारणी मध्ये योगदान दिले. तसेच जैन मंदिराचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सर्व समाजवेषक मित्रप्रिय असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आहे. कुटुंब वत्सल त्यांना पाच मुले व दोन मुली, सुना नातवंडे, पणतू, पणती असा त्यांचा खूप मोठा परिवार आहे. कुटुंबात आणि समाजात त्यांनी शिक्षणाची ओढ निर्माण केली. आज त्यांचे ४ नातू वैद्यकीय क्षेत्रात तर ६ नातू इंजिनअरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
0 Comments