हनुमंत कसबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०७ युवकांचे उत्स्फूर्त रक्तदान 

औसा प्रतिनिधी
 औसा नगर परिषदेचे दिवंगत कर्मचारी हनुमंत सदाशिव कसबे यांच्या १७ व्या स्मृतीदिनानिमित्त फ्रेंड्स क्लब औसा व मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी १०७ युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला या शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उदगे, काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर खानापुरे, शहराध्यक्ष शेख शकील, युवक काँग्रेसचे ॲड.दीपक राठोड, नगरसेवक अंगद कांबळे, ओबीसी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. हनुमंत कसबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मागील १७ वर्षापासूनची अखंड परंपरा कायम राखत फ्रेंड्स क्लबच्या पुढाकाराने अण्णाभाऊ साठे चौका नजीक असलेल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदविला या शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसचे जयराज कसबे, माजी नगरसेविका मंजुषा हजारे, पवन कांबळे, गणेश कसबे, सकीब शेख, अलताफ शेख, ओबीसी काँग्रेसचे शहराध्यक्ष भागवत म्हेत्रे, विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला, कार्याध्यक्ष नियमत लोहारे, जयराज ठाकूर, युवराज सरवदे, प्रसाद पूड, सतीश जाधव, गणेश कसबे, अजय कसबे, रवी चव्हाण, हमीद सय्यद, यांच्यासह अनेकांनी सहकार्य करून रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

Post a Comment

0 Comments