महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचा धुमधडाक्यात शुभारंभ

औसा प्रतिनिधी 
 
मनसेचे पक्षप्रमुख मा‌.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार औसा जिल्हा लातूर येथील कुमारस्वामी महाविद्यालयासमोर मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या शुभ हस्ते  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ धुमधडाक्यात करण्यात आला.साहेबांच्या आदेशानुसार सदस्य नोंदणीच्या संदर्भातील डिजिटल बोर्ड रातोरात शहरभर झळकले असून पक्षाच्या सदस्य नोंदणीस जिल्ह्यातील युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. या सदस्य नोंदणीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा सचिव धनराज गिरी,जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार,विधानसभा संघटक महेश बनसोडे,तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,शहराध्यक्ष प्रवीण कटारे,शहर सचिव अमोल थोरात,तालुका सचिव जीवन जंगाले,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद चव्हाण, तालुका उपाध्यक्ष किशोर आगलावे,तानाजी गरड,विशाल ऊस्तुरे,संदीप उस्तुरे,विठ्ठल पुंड, धीरज मस्क,यश महाजन,विकी चव्हाण,विवेक महावरकर, अभिजीत कटारे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments