श्रीराम विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात संपन्न..

औसा प्रतिनिधी
 
औसा तालुक्यातील एरंडी सारोळा येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश जाधव, सहशिक्षक नेताजी सावंत, यांनी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने शाळेच्या परिसरात रक्षाबंधनाचा उपक्रम राबविला. शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कडून रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून घेतल्या रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी वर्गामध्ये उत्साह दिसून येत होता. मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments