प्रतीक्षा विघ्नहर्त्याच्या आगमनाची मूर्तिकार शेवटचा हात फिरवू लागले
औसा( प्रतिनिधी)
विघ्नहर्ता गणरायाला अनेक नावाने संबोधले जाते श्री गणेश हा विघ्नहर्ता असून आपल्या कुटुंबातील सर्व विघ्न दूर करतो या श्रद्धेने सर्व गणेश भक्त आपापल्या घराघरातून आणि सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळाच्या माध्यमातून श्रीच्या मूर्तीची स्थापना करतात.
गणरायाच्या आगमनाची सर्वांना प्रतीक्षा लागली असून विघ्नहर्त्याच्या स्वागताला गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
त्यात मूर्तिकार ही श्रीच्या मूर्ती रंग रंगोटी करून शेवटचा हात फिरवण्याची तयारी करत आहेत. आकर्षक रंगाचा वापर करून अत्यंत रेखीव अशा गणेश मूर्ती तयार करण्याचे काम येथील सोनवलकर आणि कुंभार बंधू हे मूर्तिकार अनेक वर्षापासून करीत आहेत.
या माध्यमातून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून गणेश मूर्ती च्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो मूर्तिकार आता आपल्या कुंचल्यातून शेवटचा हात मूर्तिवर फिरवून आकर्षक व रेखीव मूर्ती विक्रीसाठी सज्ज करीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश उत्सवासाठी सर्व निर्बंध मुक्त केल्याने यावर्षी गणेशोत्सव हा धुमधडाक्यात साजरा होणार असल्याने सार्वजनिक गणेश मंडळ आणि प्रत्येकानी आपापल्या घरातून विघ्नहर्ता गणरायाची स्थापना करण्यासाठी तयारी सुरू ठेवली आहे. औसा येथील मूर्तिकारांच्या गणेश मूर्ती सर्वत्र प्रसिद्ध असून मूर्तिकार व्यवसायिकांनी गणेश मूर्तीचे स्टॉल औसा शहरात लावले आहेत.
0 Comments