अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दुष्काळ जाहीर करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दुष्काळ जाहीर करावा,व इनाम जमीन धारकांपर्यंत अनुदान पोहचविण्यासाठी कार्यवाही व्हावी  या मागणीसाठी एम आय एम च्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे 
मराठवाड्यात सर्वच भागात पेरणी उशीरा झाली व पुन्हा पाऊस सुरू झाला पेरणी करण्यात आली.काही खात बी बियाणे कंपन्यांनी बियाणे खराब दिल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली व शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पुन्हा पेरणी केली परंतु अतिवृष्टी पाऊस झाल्याने तेही हाताचे नगदी पीक हातातून निघून गेले आहे.एक एक्करी पेरणीसाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.तरी शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात यावे, व हेक्टरी 80 हजार रुपये सरसगट शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी,तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत देण्यात येते व त्यापासून बरेचशे शेतकरी देवस्थान इनामी जमीन असलेल्या बरेचश्या ठिकाणी शेतकऱ्यांची व सेवा करणा-यांची नावे मालकी रकान्यातून कमी केली असून अशा शेतकऱ्यांतील हजारो कुटुंबांना त्या योजनेपासून सतत बरेच दिवसांपासून वंचित आहेत व शासनाचा लाभ मिळत नसल्याने पुन्हा एक्करी 30 हजार रुपये खर्च करूनही पदरात  काहीच पडत नसल्यामुळे व बॅंकेकडून सोसायटी मार्फत शासनाच्या योजनेतून पीक कर्ज देण्यात येतो तोही लाभ मिळत नसल्याने शासनाच्या योजनेपासून मंदिर मस्जिद इनामी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यात यावा व सदर जिल्हाधिकारी, तहसीलदार,तलाठी,मंडळाधिकारि यांना अधिकार मधील असलेल्या यांच्या नावे मदत देण्यात यावी.जेणेकरुन अनेक वर्षांपासून वंश परंपरेने उपभोग घेत असलेल्या व अनेक वर्षांपासून वंचित राहत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा.अशी मागणी एम आय एम च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या हंगामात निधी न दिल्यास तिवर आंदोलन करण्याचा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना 24 आॅगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments