महाराणा प्रताप गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर
औसा प्रतिनिधी
औसा येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाचे कार्यकारणी निवडण्यासाठी समाजातील जेष्ठ नागरिक गोविंद सिंह गौर ,दिलीप पांडे, आणि रणजीत सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असल्यामुळे समाज जागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प नूतन पदाधिकाऱ्यांनी केला असून मंडळाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष रुपेश दुबे, उपाध्यक्ष जगदीश चौहान, कोषाध्यक्ष जयराज बाळासाहेब ठाकूर, सचिव कुलदीप बायस ठाकूर, सहसचिव मुकेश चौहान, प्रमुख मार्गदर्शक धर्मेंद्र बिशेने व संतोष वर्मा हे असून उर्वरित कार्यकारणी मध्ये सर्वश्री विशाल मोरवाड, दयानंद चौहान, जगदीश परदेशी, संजय पांडे, गणेश पांडे, अक्षय ठाकूर, विशाल पांडे मुकेश तर युवराज चौहान, रघुराज बाळासाहेब मिश्रा, आणि सुशील बायस ठाकूर यांचा समावेश आहे.
0 Comments