औसा तालुक्यातील सततच्या पावसामुळे  नुकसान झालेल्या पिकांचे खासदाराकडून पाहणी
औसा प्रतिनिधी 
औसा/ उस्मानाबाद  लोकसभा मतदार संघातील औसा तालूक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे. त्यामुळे औसा तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पीकांचे ‘सततचा पाउस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता तात्काळ पंचनामे करावे आणि एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही ही दक्षता घ्यावी अशा सुचना  खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि. 17/08/2022 रोजी औसा तालूक्यातील किल्लारी, एरंडी, सारोळा, महादेववाडी, आपचुंदा, जयनगर, कन्हेरी यांसह तालूक्यातील अतीवृष्टीबाधीत गावांतील पाहणी दौऱ्यावेळी प्रशासनाला दिल्या. जुलै -  ऑगस्ट मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप हंगाम २०२२ मधील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, उडीद, मुग, तुर पीकांवर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शंखी गोगलगाय व इतर कृमीजन्य कीडींद्वारा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. औसा तालूक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली खरीप हंगामातील सर्व पीके बाधीत झालेली आहेत. केंद्र शासनाच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता सदर पंचनामे तात्काळ पुर्ण करून पंचनाम्याचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबतच्या ही सुचना यावेळी खासदार श्री.राजेनिंबाळकर यानी संबंधीतास दिल्या.

  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बाजार समिती उपसभापती संतोष  सोमवंशी, बजरंग नेलवाड, औसा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती किशोर जाधव, तालुका प्रमुख सतीश शिंदे, किशोर भोसले, रमेश पाटील,दीपक पाटील  , तहसीलदार भरत सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी ढाकणे, गट विकास अधिकारी व यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments