जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची औसा पोलिसात तक्रार
 औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील जवळगा येथील महेश सहदेव कांबळे या फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणास जातीवाचक व अर्वाची शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की औसा तालुक्यातील जवळगा वाडी येथील संजय बाबुराव पाटील आणि सुग्रीव हनुमंत जावळे या दोन तरुणांनी जवळगा येथील महेश सहदेव कांबळे या फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकास तुला फोटो अल्बम चे 4000 रुपये देतो असे सांगून औसा येथे गाडीवर आणले. तसेच येथील रेणू हॉटेलमध्ये दारू पिऊन या दोघांनी मोटार सायकलवर महेश सहदेव कांबळे यास जवळगा गावाकडे जाऊ आणि तुला आम्ही गावात गेल्यानंतर लगेच पैसे देतो असे सांगून मोटार सायकलवर बसून घेऊन गेले. औसा येथून जवळगा पोमादेवी कडे जात असताना नगरपरिषद कचरा डेपो समोर गाडी उभा करून तेथून महेश सहदेव कांबळे यास संजय पाटील व सुग्रीव जावळे यांनी बाजूच्या नरसिंह मंदिराकडे घेऊन कमरेच्या पट्ट्याने व लिंबाचे फाटे तोडून बेदम मारहाण केली. तसेच दगडानेही मारहाण केल्यामुळे महेश सहदेव कांबळे यास गंभीर दुखापत झाली. महेश कांबळे हा बेशुद्ध पडल्यानंतर मारहाण करणारे दोघेही तेथून प्रसार झाले. दोन तासानंतर महेश कांबळे शुद्धीवर आल्यानंतर त्याने अज्ञात व्यक्तीच्या मोटरसायकल वरून आपले गाव गाठले मनस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे व शरीरावर बेदम मारहाण झाल्यामुळे व शरीरातील रक्त गोठल्यामुळे महेश सहदेव कांबळे यांनी आपणास दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संजय बाबुराव पाटील व सुग्रीव हनुमंत जावळे यांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून अर्वाचे भाषेत भाषेचा वापर करत जीवे मारण्याची धमकी दिली असून सदर घटनेचा योग्य तो तपास करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी महेश कांबळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments