अण्णाभाऊ च्या साहित्याने जगण्यासाठी लढण्याचे सामर्थ्य दिले प्रा. मच्छिंद्र गव्हाणे
 औसा प्रतिनिधी
 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत गिरणी कामगाराच्या आवाज बुलंद करण्यासाठी लढा पुकारला. कामगारांचे व्यथा वेदना शोषित पीडित दुःख आपल्या शाहिरी आणि पोवाड्याच्या माध्यमातून मांडत असताना समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेवर त्यांनी प्रहार केला होता. फकीरा सारख्या कादंबरीच्या माध्यमातून 35 पुस्तके लिहिणारे अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न झाले. आणि अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून शोषित पीडिचा ना जगण्यासाठी लढण्याचे सामर्थ्य दिले असे प्रतिपादन प्रा मच्छिंद्र गव्हाणे यांनी केले. बोरगाव तालुका औसा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती कार्यक्रम निमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिल सुतार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संपादक राजू पाटील, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे, दादा कोपरे, पत्रकार बालाजी उबाळे, व बालाजी शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश शिंदे, शाहीर अशोक बापू शिंदे, व्यंकट रसाळ, दिनकर साळुंखे, सौदागर वगरे, संतोष रसाळ, गुणवंत रसाळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पृथ्वीही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिका आणि कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे. असा विज्ञानवादी विचार मांडला म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेऊन पुढे आले पाहिजे शिक्षणाशिवाय चरणोपय नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाची कास धरली म्हणून ते जगामध्ये ज्ञान सूर्य म्हणून ओळखायला लागले. म्हणून अण्णाभाऊंनी सुद्धा जग बदल घालूनी घाव सांगून गेले माझे भीमराव म्हणून बाबासाहेबांना गुरुस्थानी मानले आहे हे विसरता येणार नाही. आजचे युगे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असून प्रत्येकानी समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट गुढी परंपरा आणि देव भोळे पणाला बाजूला सारून शिक्षणाची कास धरणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. याप्रसंगी सतीश शिंदे यांनी प्रास्ताविक केले संपादक राजीव पाटील यांनी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला पुढे घेऊन जाणारे असल्याने प्रत्येकाने या महानायकांच्या विचाराचा जागर ठेवण्यासाठी आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी बोरगाव येथील शेकडो महिला पुरुष व तरुण वर्ग उपस्थित होता प्रारंभी गावातून मदनसुरी येथील विराट हलगी संघाच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम रणदिवे यांनी केले शेवटी गुणवंत रसाळ यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments