कै. हणमंत कसबे यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त औशात भव्य रक्तदान शिबिर 
 औसा प्रतिनिधी 
 औसा नगर परिषदेचे  दिवंगत कर्मचारी हणमंत सदाशिव कसबे यांच्या सतराव्या स्मृतिदिनानिमित्त  महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक औसा येथे आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 26 अॉगस्ट शुक्रवार रोजी फ्रेंड्स क्लब औसा कसबे परिवार व मित्र मंडळ औसा युवक काँग्रेस औसा यांच्या वतीने सर्वश्री जयराज कसबे,माजी नगरसेविका अॅडव्होकेट मंजूषा हजारे,माजी नगरसेवक अंगद कांबळे, गणेश कसबे  यांनी रक्तदान हे सर्वात मोठे दान असल्याने मागील 17 वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराची ही परंपरा कायम असून या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलन करून तालुक्यातील गरजूंना एका फोन वरून रक्तपुरवठा करण्याचा उपक्रम सलग 17 वर्षापासून फ्रेंड्स क्लब औसा कसबे परिवार व मित्र परिवारांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.या कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्तदान शिबीरामध्ये 105 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य केले.व रक्तदात्यांना  प्रमाणपत्र मान्यवरांचा हस्ते देण्यात आले.या  कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे,शहराध्यक्ष शकील शेख, प्राध्यापक सुधीर पोतदार,दिपक रोठोड, सय्यद अजहरुल्ला हाश्मी, अॅडव्होकेट शाहनवाज पटेल, अॅडव्होकेट फैयाज पटेल, सदानंद शेटे,मुजम्मील शेख, जयराज ठाकूर, इस्माइल शेख,खुंदमीर मुल्ला,भागवत म्हेत्रे,नियामत लोहारे,बाबा पटेल,पवन कांबळे, राजेंद्र बनसोडे,खाजा शेख,परवेज काजी, अॅडव्होकेट मजहर शेख, गोपाळ धानुरे, नागनाथ कांबळे,संभाजी शिंदे,बाळु ढोले आदिची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबीराला लातूर ब्लड बँकेचे डॉक्टर जगन्नाथ कुलकर्णी, डॉक्टर विलास खानापुरे, अमोल जगताप,नयन पाटील,निशा बिसाने,पायल वैद्य,रुतुजा मडके,संध्या टोपे,  ऐश्वर्या भुरे, समाधान कोकणे,आशीष मुंडे, दिलीप कांबळे यांनी या शिबिराला सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments