नाथ मंदिरात श्रावण मास अनुष्ठानाची संतवाणीने आज सांगता
औसा प्रतिनिधी
औसा येथील श्रीनाथ संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी श्रावण मास अनुष्ठानचे एक महिना आयोजन करण्यात येते. या श्रावण मास अनुष्ठान मध्ये दररोज नाथ मंदिरात पांडुरंगाची महापूजा,बैठकी भजन महिनाभर दुपारच्या वेळी महाप्रसाद आणि रात्री 8 ते 9 संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचे दिव्य चक्रीभजन अशा कार्यक्रमाची मेजवानी सदभक्तांना मिळत असते. या श्रावण मास अनुष्ठान मध्ये महिनाभर नाथ मंदिराचा परिसरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर दररोज नाथ मंदिरात शिष्यगण सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांना गुरू करून घेण्यासाठी व गुरु मंत्र घेण्यासाठी भक्ती भावाने येत असतात. अनुष्ठान कालावधीमध्ये संकष्ट चतुर्थी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोवर्धन अशा विविध कार्यक्रमाचा आनंद भाविकांनी घेतला. संपूर्ण महिनाभर चाललेल्या श्रावण मास अनुष्ठानाची आज रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या संतवाणीने सांगता होणार आहे तरी भाविक भक्त व शिष्यगणांनी संतवाणी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नाथ सेवा मंडळ औसा यांच्यावतीने करण्यात येते.
0 Comments