सतत पावसामुळे पिके व फसलचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी-एम. पी. जे. ची मागणी
औसा प्रतिनिधी 
लातूर जिल्ह्यातील 7 जून 2022 रोजी पासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना 2019 मार्गदर्शक सूचना अंतर्गत 10 -4 स्थानिक आपत्ती या बाबी अंतर्गत शेती जलमय झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान शेतकऱ्यांची वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून नुकसान रक्कम निश्चित करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी. अशी मागणी मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस औशाच्या वतीने 3 ऑगस्ट 2022 बुधवार रोजी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी निवेदन देताना एम पी जे चे अध्यक्ष नजीबुद्दीन सय्यद,अतिख शेख सचिव ,उपाध्यक्ष बाबर शेख, जमीर सय्यद, अली कुरेशी, सत्तार सय्यद, सलीम सय्यद आदीची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments