कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडल्या औशाच्या शेतकऱ्यांनी व्यथा
मुख्तार मणियार 
औसा-कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी औसा तालुक्यातील एरंडी, सारोळा, जयनगर व अपचुंदा येथील पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकाची पाहणी केली. हे छायाचित्र जय नगर येथील शेतकऱ्याची संवाद साधतानाचे आहेत. गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन हे संकट कसे टाळता येईल यासाठी प्रयत्न करू.
 तसेच शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी शासनामार्फत कमिटी नेमण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आश्वासन दिले आहे.उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करीत असताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शंखी गोगलगाय दाखवून व्यथा मांडली.
सोबत आमदार अभिमन्यू पवार, कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, आमदार अभिमन्यू पवार,माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, व उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता व सर्व परिसरातील शेतकरी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments