नरसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन सोनवळकर
 औसा प्रतिनिधी
 औसा येथील श्री नरसिंह  गणेश मंडळाच्या पदाधिकारी निवडीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गणेश मंडळाची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन सोनवळकर, उपाध्यक्ष विकास मेहेत्रे, कोषाध्यक्ष भैरू यादव, सचिव अजय फुटाणे, सहसचिव प्रसाद फुटाणे, सल्लागार मंडळामध्ये सर्वश्री विशाल फुटाणे, आकाश फुटाणे ,परमेश्वर फुटाणे, विशाल माळी, आणि प्रथमेश म्हेत्रे  यांचा तर मिरवणूक प्रमुख पदी चांगदेव माळी, बालाजी फुटाणे, प्रकाश माळी, संजय माळी, कमलाकर फुटाणे, अनिल मेहत्रे यांचा समावेश आहे. नरसिंह गणेश मंडळाच्या नव नियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments