औसा तालूका अशासकीय शालेय कर्मचारी पतसंस्था औसा. सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात  संपन्न

औसा प्रतिनिधी 

औसा- तालुका अशासकीय शालेय कर्मचारी पतसंस्थेची  29  वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28आॅगस्ट 2022 रोजी  पतसंस्थेचे अध्यक्ष श्री गोविंद कदम  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षकाचे कैवारी शिक्षकांची बुलंद तोफ शिक्षकाचे भुषण विक्रम बप्पा काळे ,औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननिय अभिमन्युजी पवार हे प्रमुख पाहूणे उपस्थित होते. कार्यक्रमाची  सुरुवात   सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला.  सौ. सावंत रंजना मॅडम व श्री सावंत नेताजी सहशिक्षक श्रीराम माध्यामिक विद्यालय एरंडी सारोळा ता. औसा यांनी औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार  अभिमन्यूजी पवार व शिक्षक आमदार मा. श्री. विक्रमजी काळे यांचा फेटा ,  शाल, श्रीफल , व पुष्पहाराने भव्य सत्कार करण्यात आला.
यानंतर सालातील सर्व क्षेत्रातील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर नूतन मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला.नंतर पतसंस्थेचे माननिय अध्यक्ष श्री कदम सर यांनी अहवाल वाचन केले. नंतर गुणवंत व सेवानिवृत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच *संस्था मित्र पुरस्कार देण्यात आला. नंतर आमदार अभिमन्युजी पवार  यांचे  मनोगत  झाले.पतसंस्थेच्या वाटचालीबदल समाधान व्यक्त केले.   नंतर माननिय आमदार काळे साहेब सुदधा पतसंस्थेबदल समाधान व्यक्त केले. व रेडडी सर यांनी मनोगत मांडतांना संस्थेच्या व सभासदाच्या हितासाठी जे काही करता येईल त्याची ग्वाही दिली. कर्जाची मर्यादा वीस लाख  आहे  तसेच ठेवीवर व कर्जावरील व्याजाचा दर व लाभांश *10% असे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री *गायकवाड सरांनी केले . व आभार प्रदर्शन *हलमडगे  सर यांनी केले.या कार्यक्रमास जाधव सर , परवेज  मलेभारी सर , यादव सर ,माने सर ,पाटील सर,व सर्व संचालक व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments