ग्रामपंचायत कार्यालय करजगाव मार्फत आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा. 
औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील मौजे करजगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने  शासनाने आदेशित केल्याप्रमाणे आजादीचा अमृत महोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबास ५०० कुटुंबास मोफत राष्ट्रध्वज देण्यात आला. तसेच गावातील सर्व महिला बचत गटांच्या  महिलांचा एक महिला मेळावा आयोजित करून त्यामध्ये महिलांना स्वावलंबी बनवण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  प्रत्येक महिलेला एक केशर आंबा व एक कोलंबस जातीच्या नारळाचे झाड मोफत देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सतीश पाटील साहेब उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी तेलंग साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव , करजगावचे लोकनियुक्त सरपंच सौ सुकेशना जाधव, उपसरपंच सौ चमक जाधव ,बचत गटाचे भुत्ते , ग्रामसेवक शंकर बसरगी, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर दळवे, ॲड श्रीधर जाधव,सौ आशा आजणे, आशा गवळी, विजयाबाई दळवे,पार्वती कारे, जगताप सर ,महिला बचत गटाच्या सीआरपी मिना  कांबळे , रुक्मिण दळवे,  निलेश आजणे, सवीता जाधव, कल्पना धानुरे, पद्मजा कदम, सुनीता सूर्यवंशी, अंजना सातपुते,इत्यादी महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments