औसा शहरातील मटका बंद करून मटका चालविणाऱ्या वर कार्यवाही करण्याची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा हे सुफी संताचे ऐतिहासिक शहर असून औसा शहरातील गल्लीबोळामध्ये मोठ्या प्रमाणात मटका नावाचा अवैद्य जुगार राजरोसपणे सुरू आहे. शहरात मटका घेणारे दोन प्रमुख असून औसा शहर आणि तालुक्यात 20 पेक्षा अधिक मटका बुकिंग चालतात. या बुकिंग कागदी चिठ्ठ्यावर न घेता सांकेतिक भाषेत मोबाईल व्हाट्सअप वरून सध्या सुरू आहेत. मटका जुगारावर शहरात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून औसा शहरातील सरकारी दवाखान्याच्या दोन्ही बाजूस ,मौलाना अबुल कलाम आझाद चौक, पंचायत समिती समोर, भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला, कालन गल्ली समोरील बाजूस, तसेच लातूर वेस हनुमान मंदिर परिसर बस स्थानक आजाद चौक निलंगा वेस्ट किल्ला मैदान खंदक गल्ली इत्यादी शहरातील जागेसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात मटका सुरू असल्याने तरुण पिढी मटक्याचा नादाला लागल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. काही अल्पवयीन मुले सुद्धा मटका नावाचा जुगाराकडे आकर्षित होत असून शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालणारा मटका जुगार त्वरित बंद करावा आणि मटक्याची दुकाने चालविणाऱ्या वर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी पप्पू शेख यांनी शासकीय विश्रामगृह औसा येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे मटका बंद करण्याची मागणी पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडेही निवेदनाद्वारे केली असून या निवेदनावर पप्पू उर्फ अहमद शेख, इलियास चौधरी, सोनाली गुलबिले, नेताजी जाधव, सुवर्णा नाईक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments