स्वराज्य महोत्सवात भूतमुगळी ग्रामपंचायतचा जिल्हा परिषदेकडून सन्मान्
 औसा प्रतिनिधि
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य उपक्रमा अंतर्गत निलंगा पंचायत समिती व जिल्हा परिषद लातूर यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले.9 आॅगस्ट ते 17 आॅगस्ट या कालावधीत भुतमुगळी ग्रामपंचायतने चांगले उपक्रम राबविले याची दखल बिडीओ अमोल ताकभाते यांनी घेतली.निलंगा तालुक्यातून उत्कृष्ठ ग्रामपंचायत म्हणून जिल्हा परिषद लातूरकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, उपकार्यकारी अधिकारी गिरी साहेब, काळे साहेब, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, शिक्षणाधिकारी (प्रा ) वंदना फुटाणे मॅडम उपस्थित होत्या.हा सन्मान उपसरपंच हरिभाऊ सावंत, ग्रामसेवक भास्कर साळुंके,गुंडुरे सर,अजय मोरे सर यांनी स्विकारला.मधुकर गायकवाड सरपंच,रामकिशन सावंत चेअरमन व सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments