विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग श्री साहेबरावजी दिवेकर साहेब यांनी करजगाव गावाला दिली भेट.   

औसा प्रतिनिधी            
औसा तालुक्यातील  करजगाव येथील बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची दिनांक ११/८/२०२२ रोजी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली.त्यावेळी शेतकरी व्यंकट धानुरे,भरत पांचाळ, विजयकुमार धानुरे,केरबा धानुरे यांच्या शेतात जाऊन  गोगलगायने नुकसान केलेल्या  सोयाबीनची व सततच्या पावसामुळे दुबार पेरणी होऊन सुद्धा सोयाबीन न उगवलेल्या शेताची पाहणी केली.तसेच  संततधार पावसामुळे जमीनीत पाणी साचुन सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली . सोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गावसाने साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी क्षीरसागर साहेब ,तालुका कृषी अधिकारी ढाकणे साहेब, मंडळ कृषी अधिकारी लामजना डी एम जाधव साहेब ,कृषी पर्यवेक्षक लामजना खांडेकर साहेब, कृषी सहाय्यक कळसे पाटील, करजगावचे तलाठी बुबणे साहेब, ग्रामसेवक बसरगी साहेब,  सरपंच ॲड श्रीधर जाधव, नागेश मुगळे, निलेश आजणे,राम जाधव, बालाजी मुगळे, भरत पांचाळ, श्रीमंत दळवे, ज्ञानेश्वर आजणे, इत्यादी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments