नील संकुलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा 


औसा प्रतिनिधी
 औसा येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त आदर्श शिक्षक किशनराव नारायणराव फुलमाळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नील संकुल कळंबोली नवी मुंबई येथील परिसरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अतिशय शिस्तप्रिय वातावरणामध्ये आणि उत्साह भरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करण्यात आला. नील संकुल कळंबोली नवी मुंबई या परिसरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई ,आकर्षक फरारे व घरोघरी तिरंगा लावून व रांगोळ्या काढून या कॉलनीतील शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सव साजरा करण्यात आला.किशन कन्स्ट्रक्शन नवी मुंबईचे प्रमुख मार्गदर्शक किशनराव फुलमाळी यांनी नवी मुंबई मध्ये आपला मित्र समुदाय मोठ्या प्रमाणात जमविला असून या कार्यक्रमासाठी संत सावता माळी मंडळाचे श्री संजीव फुलमाळी, पप्पू उर्फ सत्यवान फुलमाळी ,राजीव फुल माळी यांच्यासह किशन कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी व नील संकुल परिसरातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments