प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत भविष्यात तोच यशस्वी- अमर खानापुरे

औसा (प्रतिनिधी) येथील नबी नगर स्थित ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत मोठया उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी ठिक ८ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.अमर खानापुरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
     स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये सर्वांचे लक्ष लहान मुलांच्या भाषण स्पर्धेने वेधले.यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात औसा शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष श्री.शकील शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि ऑर्बीट प्री-प्रायमरी शाळा हि एक उत्तम शाळा असून येथील शैक्षणिक वातावरण खूप चांगले आहे.विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन येथील शिक्षक एक चांगली पिढी घडवायचं कार्य करीत आहेत. मी या शैक्षणिक संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो.
     यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.अमर खानापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे या लहान लेकरांच भाषण ऐकून मला वाटतं. कारण एवढया लहान वयात एवढं चांगलं भाषण या लहान लेकरांनी केलं हे खरंच खुप कौतुकास्पद आहे.एवढा मोठा आत्मविश्वास या मुलात शाळेतील शिक्षक देऊ शकतात याचं खरा आनंद मला वाटतो.यामध्ये काय झालं आहे,आपल्या भागामध्ये धार्मिक शिक्षणासोबत ख-या अर्थाने व्यावहारीक शिक्षणाची सूध्दा समाजात फार मोठी गरज आहे.जर पुढे जायचे असेल तर शिक्षणाचा पाया मजबुत असणे फार महत्त्वाचा आहे.पाया मजबूत असेल तरच इमारत भक्कम उभी राहु शकते.मला असं वाटतं की जे पालक येथे उपस्थित आहेत त्यांना सुध्दा या गोष्टीचा नक्कीच गौरव वाटत असेल की त्यांची जी इमारत भविष्यामध्ये उभी राहणार आहे,त्याचा पाया या शाळेमध्ये अतिशय मजबूत होताना दिसत आहे.
     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्दीकी चाँदभाई, इंजि. अजहर हाश्मी,रहेमत पटेल,पत्रकार आसिफ पटेल,संस्थेचे अध्यक्ष शेख रसुलसाब गुरुजी,शेख फकीरपाशा, सरगुरु इस्माईलसाब,इंजि.अजहर शेख,आसेफ शेख,हुसेन पटेल, शहबाज शेख,अमन शेख,परवेज शेख,लातूर रिपोर्टचे संपादक मजहर पटेल,मुख्तार मणियार,उमर शेख, अल्ताफ सिद्दीकी,अरबाज शेख, अखलाख सिद्दीकी,ॲड. इकबाल शेख,शाळेतील सर्व शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या रॅलीने देशभक्तीपर नारे लावून सर्वांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजमुनेहा इकबाल यांनी केले.शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन आभार प्रदर्शन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments