स्वातंत्र्य दिनानिमित्त मनसेच्या वतीने जायफळ येथे विद्यार्थ्यांना पॅडचे वाटप

औसा प्रतिनिधी 

आज १५ ऑगस्ट देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मौजे जायफळ तालुका औसा जिल्हा लातूर या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकूण सर्वच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परीक्षा (एक्झाम) पॅडचे वाटप मनसेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ.रेखाताई नागराळे व मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्री शिवकुमार दादा नागराळे यांच्या हस्ते तसेच या नगरीचे सरपंच खंडू बिडवे,सोसायटीचे चेअरमन प्रकाश रघुनाथ भोंग,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद मोहन भोंग,पोलीस पाटील बालाजी दामोदर पाटील, उपसरपंच लक्ष्मण जोगदंड, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नवनाथ चंद्रसेन माचवे तंटामुक्तीचे अध्यक्ष निळकंठ रघुनाथ भोंग,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व स्टाफ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तसेच यावेळी जि. प.शाळेच्या परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन ही मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी मनसेचे सतीश जंगाले,प्रकाश भोंग, सचिन बिराजदार,किशोर आगलावे,तानाजी गरड,विष्णू माने,सिद्धेश्वर शिंदे,वेंकट पाटील, दीपक नवाडे इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि गावातील युवक,ग्रामस्थ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments