स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आमदार अभिमन्यू पवार यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज 
 औसा प्रतिनिधी
 संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना विविध शैक्षणिक संस्था खाजगी संस्था शासकीय कार्यालयासह प्रत्येक नागरिकांनी घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. आणि देशभरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. औसा तालुक्यातील फत्तेपुर येथील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी करजगाव पाटीवर थांबले असताना औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी इतके विद्यार्थी कसे काय थांबले म्हणून आपली गाडी थांबवली. त्यावेळी शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संवाद साधत या शाळेमध्ये तांबरवाडी, केंगलवाडी, उत्का, चलबुर्गा, दावतपूर, करजगाव अशा अनेक गावातून सुमारे 400 विद्यार्थी दररोज येणे जाणे करीत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवासासाठी बस उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना तासंतास ताट कळत उभे राहावे लागत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली. आमदार अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी करजगाव पाटी वरून घराकडे गेल्याची खात्री करूनच शालेय कर्मचारी आपल्या घरी परत जातात याची माहिती घेतली यावेळी मुख्याध्यापक मुळे यांच्यासह त्यांचे सहकारी शिक्षक व शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासोबत आमदार पवार यांनी हितगुज साधले.

Post a Comment

0 Comments