गाव नकाशा वरील रस्त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी वृद्ध शेतकऱ्याचे उपोषण सुरू
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील वृद्ध शेतकऱ्यांनी गाव नकाशा वरील अतिक्रमण झालेला रस्ता मोकळा करून पूर्वत रस्ता सुरू करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर हे मुदत उपोषण सुरू केले. याबाबतची सविस्तर माहिती अशी की नारायण लक्ष्मण माळी राहणार नागरसोगा यांची सर्वे नंबर 114 क मध्ये 40 आर जमीन असून या वृद्ध शेतकऱ्याच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून हा रस्ता रहदारीसाठी अडथळा निर्माण केला आहे. ब्रिटिश काळापासून परंपरागत रस्ता 2010 सालापर्यंत शेतकरी उपभोग घेत होते, परंतु मागील आठ ते दहा वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून हा रस्ता नष्ट केला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त औरंगाबाद जिल्हाधिकारी लातूर आणि तहसीलदार औसा यांच्याकडे सदरील वृद्ध शेतकऱ्यांनी दाद मागितली, परंतु अद्याप त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे आणि परंपरागत गाव नकाशावरील रस्ता अतिक्रमण झाल्यामुळे रहदारीसाठी अडचणीचा झाला असून सदरील रस्त्यावरील नागरसोगा ते वाघोली हा गाव नकाशावरील रस्ता पूर्ववत सुरळीत करून द्यावा. या मागणीसाठी नारायण लक्ष्मण माळी यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
0 Comments