योग गुरु नेताजी सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
 औसा प्रतिनिधी
 श्रीराम विद्यालय एरंडी सारोळा येथील उपक्रमशील शिक्षक व योग प्राणायामचे मुख्य मार्गदर्शक नेताजी माणिकराव सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव निमित्त शालेय विद्यार्थ्यांची घरोघरी तिरंगा ही जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे कार्यकर्ते तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आकाश पाटील मुख्याध्यापक अविनाश जाधव यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments