रेशन दुकानदादाराकडून पुर्ण विक्रीचे पैसे भरून स्वतःकेले मोफत धान्य वाटप
औसा प्रतिनिधी
समाजात अनेक लोक अजूनही ग्रामीण भागात एकमेकांना आधार देणे मदत करणे असा प्रवास सुरु असताना घडले असे की औसा तालुक्यातील मातोळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने नुकतेच स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यात आले असून त्याचा प्रारंभ झाला असून त्याच दिवशी गावांतील तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले यांनी त्यांच्या वडील दिवंगत अंबादास भोसले यांच्या स्मरणार्थ स्वस्त धान्य दुकानाचा आलेला सर्व राशन माल विक्रीसाठी ठेवण्यात आला होता मालाची पुर्ण
रक्कम भरून गावात मोफत धान्य वाटप केले. हा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला दिशादर्शक ठरेल असा प्रयोग मातोळकर येथील भोसले कुटुंबांनी केला आहे.
यावेळी धान्य मोफत वाटप संत मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, औसा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती राजेंद्र भोसले, मातोळा चे सरपंच बालाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच माणिक अण्णा मोरे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन व्यंकट भोसले, व्हॉईस चेअरमन गणेश भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सोसायटीचे संचालक मंडळ, ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments