अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा औसा येथे सत्कार 
औसा प्रतिनिधी
  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक येथे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अमर खानापुरे, औसा विधानसभा युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत राचट्टे, नगरसेवक अंगद कांबळे, नगरसेविका अॅड मंजुषा हजारे, डॉक्टर सचिन रणदिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येथील संजय नगर परिसरात ही मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामुळे शोषित पीडित समाजाला विकासाची चालना मिळाली असल्यामुळे अण्णाभाऊंनी लिहिलेले साहित्य सर्वांसाठी उपयुक्त असल्याने त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी समाज प्रबोधन पर विविध उपक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात येत आहेत सायंकाळी सहा वाजता औसा शहरातून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव प्रयत्नशील होते.

Post a Comment

0 Comments