आपची क्रांतीदिनानिमित्त लातूर शहरात तिरंगा रॅली
लातूर - लातूर शहरात आम आदमी पार्टीच्या वतीने लातूर शहरात क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली चे आयोजन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लातूर शहरातील स्वामी विवेकानंदांना अभिवादन करून फटाक्याच्या आतीश बाजी मध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आरंभ झाली. हि रॅली राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधीजी, क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन करून मुख्य रस्त्याने पाच नंबर येथील शहीद भगतसिंग चौकातील शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संपन्न झाली. रॅली मार्गस्थ होत असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रंगा राचूरे सर यांनी क्रांती दिनाची पार्श्वभूमी सांगत आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देशातील एका पक्षाच्या सरकारने परिवार वाद जोपासला तर आजचे सरकार मित्रत्व वादाच्या प्रेमात गुंतले आहे. असा टोला लगावत जनतेच्या मूलभूत गरजांवर कर लावून जनतेला लुटून मित्रांना वाटत असणारे सरकार देशात राज्य करत आहे, असे सांगितले. तर आज मित्रत्ववादात व परिवार वादात न पडता जनतेच्या हिताच्या भारत वादाला चालना मिळाली पाहिजे यासाठी आम आदमी पार्टी आक्रमकपणे कार्य करणार आहे.
त्यासाठी जनतेने आम आदमी पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान यावेळी केले .या रॅलीमध्ये
कार्याध्यक्ष अमित पांडे, शहराउध्यक्ष सचिन औरंगे जिल्हा सचिव सय्यद सईदोदिन,माजी सनदी अधिकारी संग्राम जमालपुरे, भागवत करंडे, सुमित दीक्षित,मिडीया प्रमुख हरी गोटेकर, मुख्तार मणियार, विजय आचार्य, आनंदा कामगुंडा, शिवलिंग गुजर, मुस्तफा सय्यद, सत्यम गायकवाड ,सतीश करंडे , चैतन्य पाटील, चांद शेख, अहेमद शेख, आजम पठाण,शफी चौधरी, दिलीप माने, चैतन्य पाटील,कुमार खोत, गणेश कसबे, श्याम माने , मुकेश रपकाळ, शेख रफिक,सत्यम गायकवाड, ताजुद्दीन शेख, जाधव, गादगे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments