आम आदमी पार्टीच्या वतीने क्रांती दिन साजरा
औसा प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी आज  9 ऑगस्ट मंगळवार रोजी क्रांती दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा मोटरसायकल रॅली हि रॅली लातुरमधील विवेकानंद चौक ते शहीद वीर भगतसिंग चौक  पर्यंत काढण्यात आली.या रस्त्यावरील स्वामी विवेकानंद, राजश्री शाहू महाराज,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी,महात्मा जोतिबा फुले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शहीद विर भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन  करून या रॅलीचे समारोह करण्यात आले.  या रॅलीमध्ये आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रंगा राचुरे, लातूर जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले, जमाल पुरे सर , सय्यद सैजूद्दीन, शहराध्यक्ष अहेमद शेख, दगडु माने, अमित पांडे, चामुंडा,ताज शेख,मिडीया प्रमुख मुख्तार मणियार, हरी गोटेकर,श्याम सचिव, सचिन औरंगे, सुमित दीक्षित आदि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments