मैमुनाबी पटेल यांचे निधन
औसा प्रतिनिधी
मैमुनाबी करिम पटेल (वय 77 वर्षे) यांचे सोमवार दिनांक 4 आॅगस्ट रोजी सकाळी पहाटे 3 च्या सुमारास वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले. गुळखेडा गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच अमिन पटेल यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दफनविधी मौजे गुळखेडा ता औसा येथे झाला त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह गावातील व पंचक्रोशीतील नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments