कॉग्रेस पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे आणि पुन्हा एकदा चोराला सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही - अमर खानापुरे 
औसा प्रतिनिधी
कॉग्रेसने 75 वर्षात सर्वांगिण विकासाबरोबर याराष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपून देशाची उन्नती केली आहे.कॉग्रेसची यशोगाथा आणि विचार गावोगावी पोहचविण्यासाठी आझादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.त्या अनुषंगाने 12 आगस्ट शुक्रवार रोजी लिंबाळा दाऊ,पासून आझादी गौरव  पदयात्रेस सुरुवात झाली असून हरेगाव,जवळगा,नागरसोगा मार्गे औसा शहरात सायंकाळी किल्ला मैदान ते बस्थानकापर्यंत पदयात्रा काढून त्याचे सभेत रूपांतर झाले.यावेळी या सभेमध्ये अमर खानापुरे यांनी स्वातंत्र्यामध्ये शून्य योगदान असणारी लोक या देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेला इंग्रजांची गुलागीरी करणारे लोक इंग्रजांचे चाटूकार लोक आज ख-या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्याच्या ठिकाणी उत्सव साजरा करत आहेत.आज आपल्याला काय सांगितलं जातंय देशाला आता संदेश दिलाय घरा-घरात तिरंगा लावा ,अरे घरा -घरात तर तिरंगा लावू आमच्या मना -मनामध्ये तिरंगा आहे.तुमच्या घरावर तिरंगा पून्हा लावा.पहिल्यांदा तुमच्या मनात तिरंगा लावा.असे करा सांगायची वेळ आली आहे.जो ध्वज हा तीन रंगाचा ध्वज आहे आणि आज ते लोक उत्साहवाची भाबा बोलतात की ज्यांना या तीन रंगाचा ध्वज मान्य नव्हता त्यांना वाटत होता की या देशाचा ध्वज हा एक रंगाचाच असला पाहिजे.आज ते लोक आपल्याला तीन रंगाचा ध्वजाची भाषा बोलतात.आज तिरंग्याला विरोध करण्या-या लोकांना सांगायची वेळ आली आहे.हा कॉग्रेस पक्ष आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे.पहिल्यांदा उतरला होता त्यावेळी निधळया छातीने छातीवर गोळ्या झेलल्या आता पुन्हा एकदा कॉग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे .आणि पुन्हा एकदा चोराला सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी सांगितले.
यावेळी या पदयात्रेत लातूर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे, प्रदेश सचिव अभयदादा साळुंखे, प्रवीण पाटील, तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक सुधीर पोतदार,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट दिपक रोठोड, अल्पसंख्याक कॉग्रेस सेलचे प्रदेश सचिव मौलाना कलीमुल्ला, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हणमंत राचट्टे,अॅडव्होकेट समीयोद्दीन पटेल, अॅडव्होकेट फैयाज पटेल, अॅडव्होकेट शाहनवाज पटेल,आदमखॉ पठाण,हमीद शेख,अनिस जहागिरदार,मुज्जमील शेख,  सुलतान शेख,अजहर हाश्मी,इस्माइल शेख,अंगद कांबळे,सौ.मंजूषा हजारे,सई पृथ्वीराज गोरे,जयराज कसबे,बबन बनसोडे,खाजा शेख, जयराज ठाकूर,खादर शेख, वसीम खोजन, विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला, भागवत म्हेत्रे, नियामत लोहारे,मुस्तफा अलुरे, आदि कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजादी गौरव पदयात्रेत सहभागी झाले होते .

Post a Comment

0 Comments